परीक्षा शाखा
अ.क्र. | परीक्षेचे नाव | परीक्षा दिनांक |
---|---|---|
1. | सेवा प्रवेशोत्तर परीक्षा | 19-5-2011 & 20-05-2011 |
2. | महाराष्ट्र लेखा लिपिक परीक्षा | - |
3. | महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग 3 परीक्षा | 24,25,26,27 May 2011 |
संचालनालय, लेखा व कोषागारे मार्फत सेवा प्रवेशोत्तर परीक्षा वर्षातून एकदा एप्रिल / मे महिन्यात घेतली जाते. तसेच सर्व विभागातील व इतर कार्यालयातील कर्मचा-यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपिक परीक्षा माहे ऑक्टोबर/नोव्हेंबर मध्ये घेतली जाते.
कामाचा तपशील :-
- दोन्ही परीक्षेचे परिपत्रक काढणे.
- मुंबई विभागाचे अर्ज स्वीकारणे.
- परीक्षेसाठी पात्र मंजुर उमेदवारांची यादी तयार करणे.
- परीक्षा केंद्र ठरविणे.
- परीक्षेचे वेळापत्रक तयार करून ते सर्व विभागांना कळविणे.
- परीक्षेसाठी प्राश्निकांची नियुक्ती करणे व प्राश्निकांकडून प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्यानंतर मुद्रणालयातून छपाई करून घेणे.
- सर्व विभागांशी संपर्क साधून सिलबंद प्रश्नपत्रिका व मागणी केल्याप्रमाणे को-या उत्तरपत्रिका/पुरवण्या वाटप करणे.
- उत्तरपत्रिका प्राप्त झाल्यानंतर नंबरिंग मशीनद्वारे उत्तरपत्रिका व स्लीपवर कोडक्रमांक टाकणे.
- मा.संचालक महोदयांच्या मान्यतेनुसार उत्तरपत्रिका तपासण्यासाठी परीक्षकांची नेमणूक करुन उत्तरपत्रिका संबंधितांना सिलबंद करुन तपासण्यास देणे.
- तपासून आलेल्या उत्तरपत्रिका व गुणांचे विवरणपत्र प्राप्त झाल्यानंतर निकाल तयार करण्याचे काम करणे.
- निकाल जाहीर झाल्यानंतर अनुत्तीर्ण उमेदवारांचे गुण त्यांचे कार्यालय प्रमुखांमार्फत वैयक्तिकरित्या कळविणे.
- अनुत्तीर्ण उमेदवारांचे त्यांनी विनंती केल्याप्रमाणे विषयांच्या गुणफेरतपडताळणी बाबतचे अर्ज निकाली काढणे.
महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग 3 परीक्षा वर्षातून दोनवेळा माहे एप्रिल/ मे आणि ऑक्टोबर/ नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेकडून आयोजित केली जाते.
कामाचा तपशील :--
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग 3 परीक्षांचे विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांची परीक्षेच्या नियमानुसार काटेकोरपणे छाननी करणे.
- पात्र उमेदवारांची यादी तयार करून सदर यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विहीत मुदतीत पाठविणे.
- पात्र उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षेसंबंधी प्राप्त झालेल्या सूचना (परीक्षेचे वेळापत्रक, हॉल तिकीट, परीक्षेसंबंधी नियम)वैयक्तिकरित्या त्यांचे कार्यालयप्रमुखांमार्फत विहित मुदतीत पाठविणे.
- परीक्षेचा निकाल जाहिर झाल्यानंतर उत्तीर्ण उमेदवांची नोंद रजिस्टर मध्ये घेणे.
- अनुत्तीर्ण उमेदवारांचे गुणपत्रक वैयक्तिकरित्या त्यांचे कार्यालयप्रमुखांमार्फत पाठविणे.
- अनुत्तीर्ण उमेदवारांकडून प्राप्त झालेले गुण फेरपडताळणीचे अर्ज एकत्रित करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगास विहित मुदतीत पाठविणे, व त्यासंबंधी आयोगाकडून झालेली कार्यवाही वैयक्तिकरित्या अनुत्तीर्ण उमेदवारांना त्यांचे कार्यालयप्रमुखांमार्फत पाठविणे.
सेवा प्रवेशोत्तर परीक्षा मे २०११ परिपत्रक
परीक्षा अर्ज
- महाराष्ट्र लेखा लिपिक परीक्षा (मराठी )(62.1 KB )
- सेवा प्रवेशोत्तर परीक्षा (मराठी ) (47.1 KB )
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग 3 परीक्षा(in Marathi) (52.7 KB )