महालेखापालांच्या नियमित लेखापरीक्षणाच्या अधिन नसलेल्या विवक्षित विभाग, विश्वस्त निधी यांच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करण्याच्या दृष्टीने 1884 मध्ये मुंबई येथील महालेखापाल यांच्या कार्यालयात बाह्य लेखापरीक्षा शाखा स्थापन करण्यात आली. सन 1894 मध्ये ही योजना सिंध प्रांतातील नगरपालिकांना व भारतातील उत्तर विभागात स्थित नगरपालिकांना लागू करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे ही योजना 1907 मध्ये इतर नगरपालिकांना, जिल्हा स्थानिक मंडळांना व छावणी निधीना लागू करण्यात आली व विस्तृत झालेला हा विभाग भारत सरकारच्या वित्त विभागाच्या सूचित नमूद केलेल्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आला. या अधिकाऱ्यास ' अधिपरीक्षक, स्थानिक निधी लेखा ' असे पदनाम देण्यात आले.

सन 1913 मध्ये विभागाची पुनर्रचना करण्यात आली व तालुका स्थानिक मंडळे, जिल्हा रुग्णालये व इतर काही लेख्यांच्या लेखापरीक्षणाचा, विभागाच्या लेखापरीक्षण कार्यक्रमात समावेश करण्यात आला. मुंबई शहराच्या लेख्यांच्या प्रत्यक्ष प्रभारासाठी ' सहाय्यक लेखा अधिपरीक्षक ' यांची नियुक्ती करण्यात आली.

मुंबई स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम 1930 संमत होण्यापूर्वी ' अधिपरीक्षक ' हा स्थानिक मंडळाचा लेखापरीक्षक होता. (शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. 273, दि. 12 जानेवारी 1907) आणि तो नगरपालिकांचाही लेखापरीक्षक होता. (शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. 2092, दि. 03 एप्रिल 1907) तो अधिनियम प्रख्यापित झाल्यानंतर, अधिपरीक्षक हे स्थानिक मंडळांचे, नगरपालिकांचे, शाळा मंडळांचे व अधिनियमांच्या कलम 4 अन्वये काढण्यात आलेल्या अधिसूचना क्र. 7679 व 9270 दिनांक 23 मार्च 1931 व 4 नोव्हेंबर 1932 अन्वये अधिसूचित प्रदेश समित्यांचे....पुढे वाचा